(१०)
जयन्ती संस्थानच्या वंश वैजयंतीमधील, श्री आऊबाईसाहेब ही मध्यमंजरी होय.
या वंशमालेतील प्रत्येक पुष्प धर्मधवल व ज्ञानसुरभ झाले आहे. सध्याच्या राजमाता पुतळाबाई राजे यांच्या ठिकाणी तर परमार्थ काव्यगंधाने दरवळला आहे. त्यांनी आपली अभंगवाणी चार पुस्तकात साकार केली आहे.
खालील भक्तिमधुर पदात त्यांची संतवृत्ति व विठ्ठलप्रीति प्रतिबिंबित आहे.
अमृत ते प्रेम हृदयी भरला साठा।
मनाची राहे वृत्ति स्थिर पायि तुझ्या
गाता विठ्ठलाची गीत प्रेम वोसंडत।।१।।
सकल इंद्रिया पडो तेचि वळण
हृदयकमलि विठ्ठल स्वरूप राहो अढळ।।२।।
दासाची आता इतुकीच आस।।
त्यांचे पुत्र विजयसिंगराव हे विद्यमान राजे असून प्रगतिपर विचारांचे आहेत. शिक्षण विभाग व शासनविभाग या क्षेत्रांत महाराजांनी केलेल्या सुधारणा विशेष उल्लेखनीय आहेत.
महाराष्ट्राला सर्वथैव भूषणभूत अशा या राजवंशाचा आचंद्रार्क अभ्युदय चिंतून, परमतत्त्वाचे ऋग्वेदीय ऋचेने मनन करीत हा पुरस्कार संपवितो.
- धुं.गो.विनोद, ६२९, शनिवार पेठ, पुणे.
ॐ ॐ ॐ