प्रस्तावना

परंपरा तुटली की, प्रगती खुंटलीच

(५)

रूढी व परंपरा यात मी भेद कल्पितो. रूढी कालांतराने बदलतात, बदलल्याच पाहिजेत. अंधरूढीचे अनुकरण केल्याने प्राणशक्तीचा व कालाचा अपव्यय होतो. मिथ्याचार व प्रतारणा यांना अवसर मिळतो. हाच अभिप्राय इमर्सन खालील शब्दांत व्यक्त करतो.

The objection to conforming to usages that have become, dead to you, is that it scatters your force. It loses your time and blurs the impression of your character. So much force is withdrawn from your life.

हे सर्व खरे. जीर्ण रूढीचा त्याग झालाच पाहिजे. पण त्या रूढींनी आच्छादिलेल्या तात्त्विक परंपरेचा त्याग न होईल याचीही काळजी घेतली पाहिजे.

गीतकार सांगतात -

एवं परंपराप्राप्त इमं राजर्षयो विदु:।

स कालेनेह महता योगो नृष: परंतप।। - (अ. ४,२)

राजर्षींनी जोपासलेली, उपासिलेली योगपरंपरा नष्ट जाली हे अधर्माचे अभ्युत्थान व त्याच्या प्रतिकारार्थ गीतेचा व गीताकाराचा अवतार !

परंपरा सुटली की, क्रमविकासाची (Evolution) शक्यताच नष्ट झाली.

परंपरा तुटली की, प्रगती खुंटलीच.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search