(४)
श्री आऊबाईंच्या कसोटीची वेळ आली. तरूण वय, जबाबदारी मोठी, आधार कोणाचा नाही.
थोड्या दिवसांनी खानाजीही दिवंगत झाले. स्वत:ची वृत्ति, अंतर्मुख व प्रभुचरणी लीन झालेली. पण कुलकीर्ति संरक्षिली पाहिजे.
“का सरक्ष्याचे? कीर्ति:” आद्य शंकराचार्य म्हणतात, “संरक्षण कशाचे करावयाचे? कीर्तिचे?” कुलकीर्तिचे, राष्ट्रकीर्तिचे?
अतएव आऊबाईंनी विचार केला:-
क्षत्रियाच्या कुळात। जन्मा घातले तुवां सत्य।
म्हणून क्षात्रधर्माप्रत आचरणे भाग आले।।
मी येथेच बसले जरी। ऐसीच मृगासनावरी।
तरी पतिश्वशुर स्वर्गांतरी। दोष मला देतील।।
राणी असून बैरागीण। बैसली ही होऊन।।
त्यामुळे मावळून। नाव जाईल डफळयाचे।।
आम्ही शौर्याची कमाल केली। गादी जतेस स्थापिली।।
ती या पोरीने बुडविली। वैराग्य सेवून।।
- श्री दास गणू
भोसल्यांच्या रक्तमांसाने घेरलेले व बाबाजीच्या पतिमूर्तिने पावन झालेले तिचे अंत:करण कर्तव्याला जागे राहिले यात काय नवल? परंपरेचा प्रभाव तो हाच.