प्रस्तावना

मंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद

पुस्तकाचे नाव: मंत्रशास्त्र आणि बुध्दिवाद

लेखक: श्री. खरेशास्त्री

प्रस्तावना: न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद

राजकीयदृष्ट्या परोपजीवी झालेले राष्ट्र जेत्यांच्या दृष्टिकोनाने आपल्या संस्कृतीचे महत्त्वमापन करीत असते. `भारतीय संस्कृतीचे अंत:स्वरूप प्रतिगामी प्रवृत्तीचे आहे, भारतीय जीवन आंधळया धर्मश्रद्धेने बुरसटलेले आहे, भारतीय जनतेत बौद्धिकता नाही, कठोर तर्कनिष्ठा नाही, शास्त्रीय दृष्टी नाही' - असली विधाने परकीय पंडित, परकीय वृत्तनिवेदक व राजकारणी पुरूष गेली शे-दीडशे वर्षे अव्याहतपणे करीत आले आहेत. प्रचलित शिक्षणपद्धती, उघड व गनिमी पद्धतीने असल्याच मतांचा बीजारोप करीत आली आहे. दास्यात दडपलेल्या, गुलामगिरीत गारठलेल्या लोकांना स्वत:च्या सजीव अस्तित्वाचीही स्पष्ट जाणीव राहत नाही. व्यास म्हणतात, “नरोऽपी सन् अस्वतंत्र: तस्य कीट्टक् मनुष्यता।” - परतंत्र राष्ट्र माणुसकीलाच मुकते, विचारशक्तीला विसरते, विवेकभ्रष्टांचा विनिपात शतमुखांनी, सहस्रमुखांनी होत राहतो. विवेक म्हणजे निवड करण्याची शक्ति. आपली हीच शक्ती नष्ट झाली आहे. परतंत्र, पराजित, अनुकरणात्मक वृत्तीमुळे भारतीय संस्कृतीच्या व जीवनाच्या अंगोपांगांविषयी आपल्यामध्ये जिवंत जिज्ञासा नाही, सूक्ष्म शोधकबुद्धी नाही, आपुलकीची आस्था नाही.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search