पुस्तकाचे नाव: ढोलकीवरील रंगबाजी लावण्या
लेखक: बापूराव महादेव जिंतीकर
आशीर्वाद : न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद
..............
पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांचे लावणी-वाङ्मय हे महाराष्ट्र सारस्वताचे एक भाग्य-भूषण आहे.
पेशवाईत झळकलेल्या प्रतिभेची परंपरा पठ्ठे बापूरावांनी करून आजकालच्या महाराष्ट्राला ऋणाईत केले आहे.
सगनभाऊ, प्रभाकर, अनंत फंदी, परशराम शिंपी, राम जोशी व होनाजी बाळ यांच्या षड्जानंतर उच्च सप्तम शोभणार्या या गानगंधर्वाची व माझी अनेक वेळा भेट झाली होती. पठ्ठे बापूराव यांच्या आंतरजीवनाला एक धार होती.
ते नेहमीच पर्वताच्या कड्यावर झेप घेण्यासाठी उभे असलेले दिसत!
श्री बापूराव जिंतीकर यांनी स्वार्थत्यागपूर्वक हे पठ्ठे बापूरावांचे लावणी-वाङ्मय संपूर्णत: प्रसिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे.
त्यांच्या नेहमीच्या धडाडीने ते यशस्वी होत चालले असून पुढील सर्व भागही प्रकाशात येतील अशी माझी दृढ श्रद्धा आहे. त्याचा सत्य संकल्प पूर्ण व्हावा हीच ईशचरणी प्रार्थना.
-धुं.गो. विनोद, नागपंचमी श्रावण शु. ५, शके १८७६
ॐ ॐ ॐ