महर्षींचा वेदांचा विशेषतः त्यातील उपनिषदांचा गाढा अभ्यास होता.
वैदिक संस्कृती, वेदकालातील ऋषी, त्यांनी केलेले कार्य याविषयी ते आदरपूर्वक व सोदाहरण बोलत व लिहित असत.
याज्ञवल्यांचा शुक्ल यजुर्वेद व त्यांचे तत्वज्ञान त्यांना विशेष प्रिय होते असे दिसते.
त्यांच्या पत्नीचे नाव त्यांनी मैत्रेयी या विदुषीचे ठेवले होते.