दीपावली अंक - १९६७ (२१)
- १ -
ज्ञानदूताचा हा आठवा अंक आठवा अवतार!
श्रीकृष्ण हा ईश्वराचा आठवा अवतार आहे.
हा ज्ञानाचा दूत आहे. ज्ञानाने याला पाठविलेले आहे. ज्ञानाची विविध अंगे व प्रकार हा घेऊन येतो; त्यांची वैशिष्ट्ये प्रकट करतो विशद करतो.
दुसरा अर्थ ज्ञान हाच अेक दूत आहे. अतीन्द्रिय सत्तेच्या किंवा सत्याचा हा संदेशवाहक आहे.
गेली आठ वर्षे प्रत्येक दीपावलीला ही एक पणती लागते. खरोखर ती कोण लावतो कोणास ठाऊक. तिला उजळणाऱ्या हातामागे अंनत हात असतील यात संशय नाही .
ही पणती घेऊन अेक `तारा' अवर्तीर्ण होते, तिच्या अंगुलीला धरून `अ-मित आंनद, अ-मित स्फूर्ती व अ-मित एैश्वर्य प्रवेश करतात. अ-मितच्या शेजारीच `शमा' अर्थात् एक दिव्य ज्योती लकाकत आहे. अमित-शमा अनंत ज्योती म्हणजेच दिवाळी होय.
- २ -
गुढवाद हा एक तात्विक वाद आहे. `वादा' मध्ये विशिष्ट उपपत्ती असते. त्या उपपत्तीला प्रेरक, पोषक व विरोधक अशी विविध प्रमाणे असतात.
गुढवादाची प्रमुख बैठक अंतिम सत्याच्या अज्ञेयतेवर आधारलेली असते.
गुढ म्हणजे झाकलेले, किंवा मुद्दाम झाकलेले. मुळ संस्कृत धातु `गुह' म्हणजे झाकणे.
मानवी बुद्धीच्या सीमा निश्चित आहेत. अंतिम सत्याचे स्वरूप बुद्धीला अ-गम्य, अ-ज्ञेय अ-तवर्य आहे व तसेच रहाणार .
प्रत्येक शक्तीच्या स्वयंभू व स्वयंसिध्द अशा मर्यादा असतात. पाण्याचा विस्तव होणार नाही. वाफ होईल. असे तार्किक शिरोमणि यामुनाचार्य हे प्रसिध्द मीमांसक म्हणतात.
कोणत्याही वस्तूला किंवा शक्तीला मर्यादा आहेत. मर्य: म्हणजे मनुष्य मर्यादावान असतो तो मनुष्य. अमर्याद केवळ एक परमेश्वर आहे, ब्रह्म आहे त्या व्यतिरिक्त दुसरे काही अमर्यादित नाही. अंतिम सत्य बुद्धिच्या पलीकडचे आहे. अतअेव ते अनाकलनीय-अज्ञेय रहाणार.
गूढवादाची तत्त्वें, आपण ज्याला सर्व सामान्य बुद्धि म्हणतो तिच्या `धोपटमार्गावर' आढळावयची नाहीत. रत्ने चव्हाट्यावर सापडत नसतात. त्याचे जतन संदुकेत करावयाचे असते.
`श्रद्धा' म्हणजे सत्य `धारण' करण्याची शक्ती. सत्य नुसते आकलन करण्याची शक्ती नव्हे. प्रत हे सत्चे वैदिक स्वरूप आहे. गूढवादाच्या तत्त्वांचे दर्शन श्रद्धेच्या प्रकाशात होऊ शकते, एरवी नाही.
सर्व तार्किक उपपत्तींमध्ये गूढ-वाद शेवटी स्वीकारावा लागतो. प्रत्यक्ष वाद किती दुबळा आहे हे आपल्या सहज ध्यानात येईल. एखादी टाचणी देखील आपल्याला संपूर्णपणे पहाता येत नाही. तिचा थोडा भाग दृष्टी आड राहतो. तो अनुमेय असतो. तर्काने अनुमानावा लागतो.
अंतिम सत्य अशा परमेश्वराचे संपूर्ण दर्शन त्याच्या एका अंशाला कसे होणार. सागराच्या एका बिंदूला साऱ्या सागराचे सिंधूचे दर्शन कसे होणार?
- ३ -
`वाद' म्हणजे अंतिम सत्याबद्दलची एक भूमिका. यालाच दर्शन अशी संज्ञा प्राप्त झाली. दर्शने ही अंतिम सत्याबद्दलची विविध दृष्ट्रिकोन आहेत.
वैशेविकांचे अनुवाद मीमांसकांचा कर्मवाद, वेदा्न्त्यांचा मायावाद इत्यादी सर्व वादांमध्ये तत्त्वत: गूढवाद अंतर्भूत आहेच. कारण ती दर्शने बुद्धिला अगम्य असणाऱ्या अंतिम सत्याचा विचार करतात.
गूढवाद हा एक स्वतंत्रवाद आहे, असे म्हणता येते. पण त्याचा अर्थ अगदी मर्यादित आहे.
वस्तुत: सर्व वादांमध्ये गूढवाद असतोच कारण बुद्धि हे इंद्रिय अंतिम सत्याचे दर्शन करून देण्यास पुरेसे आहे असे कोणीही मानत नाही.
बुद्धिची क्रिया अन्वय-व्यतिरेकात्मक आहे. अन्वय म्हणजे साम्य ओळखणे. व्यतिरेक म्हणजे भेद दाखविणे. अंतिम सत्यास `साम्य' असण्याचा संभवच नाही. साम्य दाखविण्यास दुसरे अंतिम सत्य दाखविणे आवश्यक आहे. पण `दुसरे' अंतिम सत्य कसे असणारा असेल तर ते `अंतिम' कसले, अंतिम सत्य हे एकच असू शकते.
भेदांबद्दल हीच अनवरल्या प्राप्त होते. भेद करायचाच तर, अंतिम सत्याचा सर्वच इतर वस्तूंशी भेद असणारा व हा भेद सर्वतोपरी व सर्व प्रकारचा असणार!
भेद तीन प्रकारचे संभवतात. स्व-गत, स्व-जातिय व वि-जातीय. स्वगत भेद म्हणजे झाडातील मूळ, खोड, पान, फुल, फळ इत्यादी. सजातिय भेद म्हणजे एका वृक्षाचा साऱ्या वृक्षांपासून भेद. विजातीय भेद म्हणजे झाडाचा दगडाशी, माणसाशी किंवा इतर पदार्थापासून भेद.
भेद असावयास व कळावयास साम्य असावे लागते.
अंतिम सत्याचा दुसऱ्या कोणत्याही वस्तूंशी वरील प्रकारच्या कोणत्याही भेद संभवत नाही. अतव्येव अंतिम सत्य हे साम्यांसाठी व भेद संभवत नाही. अतव्येव अंतिम सत्य हे साम्यांसाठी व भेदासाठी उपलब्ध होत नाही.
निरनिराळे वाद सिद्ध होण्यापूर्वी व सर्व वाद सिद्ध झाल्यावरही गुढवाद अस्तित्त्वात होता, उपलब्ध होता व तो केव्हाही असणारच.
- ४ -
गूढवादाचा अगदी प्राचिनतम उल्लेख ऋग्वेदाचा पहिल्या मंडलातील १२९ व्या सूक्तांत आढळतो. सर्व वादांचा सूक्ष्म स्वरुपांत त्यामध्ये उल्लेख झालेला आहे, असेही म्हणता येईल. `नासदीय' सूक्त असे त्यांचे नाव आहे. या सूक्ताच्या अर्थाबद्दल अनेक दृष्ट्रिकोन आहेत. या सूक्तांत सात ऋचा आहेत.
त्रिष्टुप वृत्तांत असलेल्या, अकरा अक्षरी चार चरणांच्या सात ऋत्यांमध्ये बीजत: जगांतले सर्व तत्त्वज्ञान सामावले आहे असेही म्हणता येईल.
या सूक्तामधील संशयवाद, जडवाददेखील आधुनिक मनाला विशेष आकर्षक वाटतील. यातील दुसरी ऋचा अशी आहे.
न मृत्यु: आसीत् अमृत न तर्हि ।
न रात्या अत्म आसीत् प्रकेत: ।।
आनीत् आवातं स्वधया तत् ऐकम् ।
तस्मात् ह अन्यत् न पर: किंचन आस ।।
तेव्हा (सृष्टिच्या प्रारंभी) मृत्यू म्हणजे मृत्यूग्रस्त, नाशवंत सृष्टी नव्हती व म्हणून (अमृत) म्हणजे अविनाशी नित्य पदार्थ व मृत्युग्रस्त (हा भेद) ही नव्हता. तसेच रात्र आणि दिवस यांचा भेद कळण्यास काही साधन (प्रकेत) नव्हेत.
(जे काय होते) ते एकटे एकच. स्वधेने म्हणजे आपल्या शक्तीने वायूशिवाय श्वाशोच्छ्वास करीत म्हणजे स्फुरत होते. त्या खेरीज किंवा त्यापलिकडे दुसरे असे काहीच नव्हते.
येथे `अ-वातम्' म्हणजे वायूशिवाय हा शब्द महत्त्वाचा आहे.
पृथ्वी, आप, तेज, आकाश व वायू देखील तिथे नव्हता.
वायूशिवायचे ते श्वसन म्हणजे काय? ज्याला वायू लागत नाही असा श्वास. कसा असू शकतो? असे जे काही तत्त्व - सर्व भौतिक तत्त्वांच्या पलिकडले असणारे तत्त्व त्याचा येथे निर्देश आहे. येथे त्याला आत्मा किंवा जीव म्हटलेले नाही. वायूशिवाय श्वास करणारे असे काही अचि्न्त्य अनाकलनीय अनिर्देश्य जे तत्त्व, त्या तत्त्वाचा येथे स्पष्टपणे निर्देश झाला असेल. त्याला आत्मा, ब्रह्म असे कोणतेच नाव दिलेले नाही. जे काही आहे ते `गूढ' च आहे.
ऋग्वेदामध्ये जो अत्यंत प्राचिन असा भाग समजला जातो, त्यामध्ये आलेली ही एक ऋचा आहे. ती सर्वच ऋचा संशयवादी किंवा गूढवादी अशी समजली जाते!
या ऋचेत मानव समाजाचा पहिला गूढ-वाद अवतीर्ण झाला आहे असे आपण सहज म्हणू शकतो.
अंतिम सत्य `जड' नाही किंवा अ-जड नाही; किंबहुना ते ब्रह्म, चैतन्य, आत्मा यासारख्या सुप्रसिद्ध शब्दांनी पूर्णत: व्यक्त होणारे ही नव्हे.
उपनिषत्कारांनी खालील सुपरिचित पंक्तीत गूढवादाचे रहस्य प्रकट केले आहे.
`यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।' तैत्तिरीय - २-४.