[महर्षि न्या. डॉ. विनोद यांची बीजाक्षर मीमांसा, पश्यंती (२८)]
------------
मंत्र शास्त्र हे मनावर अधिष्ठित आहे. आणि मनाच्या आधीन इंद्रीये आहेत. म्हणून इंद्रीयांवर होणाऱ्या ''सुखदु:खयो`` हे गीतेतील प्रतिपादन या दृष्टीने उद्बोधक आहे.
मंत्र - मन आणि व्याधी यांचा अशा तह्रेचे सामर्थ्य आहे. त्या मंत्राचेही विविध प्रकार आहेत. वेद मंत्रापासून तो जारण मारण विद्येतील प्राकृत आणि दुर्बोध शब्दरचनेच्या शाबरी मंत्रांपर्यंत अनेक प्रकार प्रचलित आहेत.
परंतू या सर्वांत बीजाक्षरी मंत्राचे सामर्थ्य आणि वैशिष्ट्य अलौकीक आहे. या संबंधीचे वाङमय फारसे कोठे उपलब्धही नाही. आणि त्या मंत्राचे दृष्टे आरि अधिकारी सद्गुरू ही आढळत नाहीत. तथापि जागतिक कीर्तीचे महर्षी न्यायरत्न विनोद डॉ. धुंडीराज विनोद यांनी याबाबत केले विवरण मोठे मननीय आहे.
बीजाक्षर विद्या ही परा-विद्या होय. वेद चतुष्ट्य हे देखील अपरा विद्येत गणले जाते.
परो विद्या ही शब्द व त्याचे अर्थ किंबहुना सर्व बुद्धीग्राह्य व इन्द्रीयगम्य विश्व यांच्या पलीकडील कक्षा आहे. 'यतो वाचा निवर्तंते अप्राप्य मनसा सह।'
या विद्येत शब्द नाही. शब्दजन्य अर्थ नाही. ती केवळ अ-क्षर म्हणजे अविनाशी, त्रिकालातीत व केवळ स्वरूपमय अशी विशुद्ध शक्ती आहे. ती अशी असल्यामुळे सर्व सृष्टिला विश्वाला, विश्वदेवांना व एकंदर अतीमानव श्रेणीला देखील अधिष्ठानभूत आहे.
तिचे स्वरूप व लक्षणे यांचे विवेचन, अपरा विद्येत अंतर्भूत होणाऱ्या वेदांना देखील संपूर्णपणे करता आले नाही.
तंत्र शास्त्रांतला एक महान संकेत येथे ध्यांनात घेणे आवश्यक आहे. दृष्टाला अदृष्ट व ज्ञेयाला अज्ञेय हे नेहमीच आधारभूत व अधिष्ठानभूत असते.
दृश्य वृक्षाला आधारभूत असलेली पाळे-मूळे नेहमी अदृश्यच असतात. ती दृश्य झाली तर त्या वृक्षाचे उन्मूलन होईल तो जीवंतच रहाणार नाही.
बीज-शक्ती ही अशीच नेहमी अदृश्यच असते, अज्ञेय असते. कारण ती सर्वांपार स्वरूपच आहे.
परा-विद्येचे, अ-क्षर अशा ब्रह्मविद्येचे (अक्षरं ब्रह्म।) स्वरूप विशद करण्यासाठीच, चतुर्वेदांचा, चौदा विद्यांचा व चौसष्ट कलांचा आविष्कार झाला आहे.
अ-क्षर तत्त्व काय आहे हे जाणणे म्हणजेच क्षर सृष्टीचे मूलतत्त्व अर्थात 'बीज` जाणणे होय.
'बीजाक्षर` हा शब्द कर्मधारय व षष्ठितत्पुरूष या दोन्ही प्रकारच्या समासांनी स्पष्ट करणे शक्य आहे. 'बीज हेच अक्षर, हा कर्मधारय, व बीज हे ज्या मंत्राचे अक्षर तत्व आहे, अशी बीज मंत्र किंवा विद्या म्हणजे बीजाक्षर विद्या.
बीजाक्षर मंत्र व बीजाक्षर विद्या हे शुद्ध अध्यात्म शास्त्रांत सप्रसिद्ध व सुप्रतिष्ठित आहेत. 'श्री` हे आद्य अक्षर आहे. 'श्री` विद्या ही विख्यात मंत्र विद्या आहे, तीच अक्षर विद्या, बीजाक्षर विद्या.
बीजाक्षर वृक्ष, वृक्षातून बीज ही संतती, ही पुनरावृत्ती अखंड व अविरत सुरू आहे, हेच बीजाचे, बीज शक्तीचे अमरत्व आहे.
यंत्र, मंत्र, तंत्र या तीन विद्या सर्व गूढ व अतींद्रीय विद्या यांचे मूलाधार चक्र म्हणजे बीजविद्या होय. कलकत्त्याचे एक माजी चीफ जस्टिस सर जॉन वुड्राफ, हे तंत्र मंत्र विद्येचे महान संशोधक होते. त्यांची बीजाक्षर विद्येवर ऋरीश्ररवि षि श्रशींींशीी हा एक लहानसा पण महत्त्वपूर्ण गूढ - गंभीर अर्थ विशद करणारा ग्रंथ लिहीला आहे.
ॐ कार किंवा प्रणव व अ - उ - म हे त्याचे अवयव ही (एक व तीन अशी चार बीचे) 'शांत` किंवा अशब्द बीजे म्हणून प्रसिद्ध आहेत.ॐ हा उच्चर स्वयंपूर्ण आहे. तो स्वर-व्यंजनात्मक 'शब्द` होऊ शकत नाही. त्याची घटना व रचना उच्चर व विनियोग हे सर्व काही व्याकरणातीत व विवेचनातीत आहे.
शब्द सृष्टीला ही बीजे आधारभूत आहेत.
मानवमात्राची श्वसनक्रिया हीच प्रस्तूत प्रणवबीजाचा या ॐ काराचा स्वभावत:च अखंड उच्चर करीत आहे. ॐ कार हा सृष्टींतला स्वयंसिद्ध आचार आहे. त्या ॐ कारामुळेच श्वसनक्रियेची सिद्धी होते. श्वसनक्रियेत तो ऐकूही येतो. गंगोत्री व जम्नोत्री या दोन्ही ठिकाणी, -- पहिल्या प्र - प्रांतात ॐ कार ध्वनी स्पष्ट ऐकू येतो, असा प्राचीन ऋषी मुनींचा, काही आधुनिक यात्रिकांचा, व माझा स्वत:चाही प्रत्यक्ष अनुभव आहे. हे स्थान गंगोत्रीच्याही मागे आहे.
प्रणव किंवा ॐ कार ही मानवाला मिळालेली ब्रम्हर्षि हिमालयाची महनीय देणगी होय. भारतीय संस्कृतीचे तत्त्वशास्त्राने हे तत्त्वरत्न पंचप्राणांच्या मंजूषेत परम आदराने जपून ठेवले आहे.
देवतांच्या प्राणप्रतिष्ठा मनांत षोडष बीजे आहेत. ती बीजे मृण्मय मूर्तीचे ठिकाणी प्राण-स्पंद उत्पन्न करू शकतात. असा वैदिक दैवतकांडाचा एक गूढ संकेत आहे. या संकेतावरच देव-देवतांचे अर्चन व संपूर्ण दैवत विद्या आधारलेली आहे.