[(दिवाळी १९६८)पश्यन्ती (१५)]
------------------------------
१)
ज्ञान-दूताचे हे नववे दर्शन, नववा सांवत्सारीक उन्मेष, नववी नवदीप्ती.
हा दीपावलीचा अंक म्हणजे अनंत जिज्ञासूंसाठी तेज:किरणे प्रक्षिप्त् करणारी एक तारा आहे.
या तारेची अंगुली धरून एक लहानशी शमा, लकाकणारी ज्योती, अंध:काराचा भेद करील अवकाशांतून अवतरत आहे.
अमित प्रकाश, अमित आनंद, अमित उत्साह हा शमेचा अनुचर आहे.
असे हे तारा मंडळ दीपावलीचे नव-वैभव प्रकट करीत आहे.
आज ज्ञान-दूताचा हा नववा अंक प्रसिद्ध होत आहे.
नऊ ही सर्वांत मोठी व पूर्ण संख्या आहे. एकापासून नवापर्यंत सर्व मूल संख्या संपतात. दहामध्ये एक व शून्य हे दोन अवयव आहेत. एक हा पहिला अंक व शून्य म्हणजे संख्येचा अभाव.
पूर्णतेचा वाचक म्हणून नऊ ही संख्या वापरतात. पण खरोखर पूर्ण म्हणजे काय, पूर्णतेचा अर्थ काय?
नारायण नऊ आहेत, नाथ नऊ, दुर्गा नऊ, भक्ती नवविधा, ग्रह नऊ, राने नऊ अशी कित्येक उदाहरणे स्मरतात.
२)
मानवी उत्क्रांतीच्या म्हणजेच परिणतीच्या उच्चेत्तम बिंदूला पूर्ण-प्रज्ञ, स्थित-प्रज्ञ, जीवन्मुक्त, गुणातीत, परमहंस, अर्हत, जिन, केवल अशा अनेक संज्ञा आहेत. त्या सर्वांचे लक्ष्य एकच असणार; पण हे संज्ञाभेद परिणती-क्रमांतील, विकासक्रमांतील विविध अवस्थांचे ज्ञापम आहेत.
या वस्तुस्थितीमुळे विचारवंतांमध्ये देखील तीव्रतम मतभेद झाल्याची इतिहासाची साक्ष आहे. किंबहुना सर्व धार्मिक मतमतांतरे ही असल्या गौण भेदांमुळे उद्भवलेली असतात.
पूर्णत्वाची ओढ जीवनमात्राला असते. ही स्व-भावाची ओढ आहे. पूर्णत्वाची ओढ ही एक मूल-प्रेरणा आहे. पण पूर्णत्व म्हणजे काय? ही एकच, एकजिनसी वस्तू आहे, किंवा पूर्णत्वाचे अवस्था भेद रहीत, कोटीभेद आहेत. याचा विचार व्हावयास हवा.
माझ्या मते, मनुष्य ज्या पूर्णत्वाचा विचार करू शकतो ते 'पूर्णत्व` सापेक्ष आहे. तो बिंदू, जो दृष्टिकोन आपण स्वीकारू, त्यावर पूर्णत्वाची कल्पना अवलंबून असते.
'मनुष्य` म्हणून अपूर्ण असला, अविकसित असला तरी, त्या विशिष्ठ अवस्थेत, उदाहरणार्थ बालक अवस्थेत ती व्यक्ती बालक म्हणून पूर्णच असते.
इटालियन बाल-शिक्षण-तज्ञ मादाम माँटेसरी हिचा प्रमुख शोध व सिद्धान्त हाच होता. मुलांचे मानस-विश्व हा एक स्वतंत्र शास्त्राचा विषय आहे. ते एक स्वयंपूर्ण विश्व आहे. वयांत आलेल्या मानवांचे अंशत: विकसित, अपूर्ण असे स्वरूप, अशी अवस्था नव्हे.
'उहळश्रव'ी ाळवि ळी ििीं ींहश ाळवि षि रि र्ीसिीिुि शिीीिि. खीं ळी रि शिळींींू लू ळींीशश्रष.'
बाल, तरूण, वृद्ध या अवस्था अशा दृष्टिने स्वयंपूर्ण येतील. वीजेची कोर, चतुर्थीचा चंद्र स्वत:च्या अर्थाने पूर्णच आहेत. पौर्णिमेचा चंद्र तेवढाच पूर्ण असे नव्हे.
पूर्णाबद्दलची आपली कल्पना इतकी सापेक्ष आहे की, अंश की पूर्ण यांमधील भेदच नष्ट होईल की काय अशी साधार भीती वाटते.
ज्याला आपण 'अपूर्ण` म्हणतो, ते दुसऱ्या अर्थाने, दुसऱ्या संदर्भात 'पूर्ण` असू शकते.
३)
एकंदर शब्द-ज्ञान, इंद्रिय-ज्ञान, वृत्ति-ज्ञान, म्हणजे अन्तिम अर्थाने ज्ञानच नव्हे, अवधूत गीतेमधील खालील श्लोकांत या भूमिकेचे यथायोग्य वर्णन आहे.
ज्ञानं न तर्को न समाधियोग:।
न देशकालो न गुरूपदेश:।।
स्वभावसंवित्तिरहं च तत्त्वं।
आकाशकल्पं सहजं ध्रुवं च।।
ज्ञान म्हणजे तर्क नव्हे, समाधि-योग नव्हे, देशकालाचे ज्ञान नव्हे, गुरू-उपदेशही नव्हे, ज्ञान हे स्वभाव-सिद्ध, संवित्ति म्हणजे संवित् किंवा सूत्रात्म-स्वरूप आत्मचैतन्य आहे. ज्ञान हे स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे तत्-त्व आहे. ते आकाशासारखे निरूपाधिक, निरवयव, निस्सीम, अनंत आहे. ते ध्रुव म्हणजे शाश्वत, अमर आहे.
ज्ञान ही एक शक्ती आहे.
वीज ही अशी एक शक्ति आहे, ती अनेक स्थळी, विविध स्वरूपांत अनेक यंत्रद्वारा प्रकट होत असते, पण ती यंत्रे म्हणजे वीज नव्हे.
विद्युत-शक्तिप्रमाणे ज्ञान-शक्ती अनेक उपकरणांचे द्वारा प्रकट होत असते.
आपली चक्षुरादि सर्व इन्द्रिये ज्ञानाची उपकरणे आहेत. उपकरणांतील, साधनेतील ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती, ज्ञान-क्षमता ज्ञानवत्ता हे ज्ञानाचे खरे, मूल-स्वरूप आहे.
ज्ञान म्हणजे चैतन्यल चिती, ज्ञिप्त् असेच शेवटी म्हणावे लागते.
४)
'केवल` या शब्दाचा अर्थ फक्त 'ते` च.
'तत्त्व` शब्दाचा अर्थ हाच आहे.
'तत्`, 'त्व`, 'ते पण`, 'तत्त्वमसि` या महावाक्यांमध्ये हाच अर्थ अभिप्रेत आहे.
जगाचे, जीवनाचे व जगदीश्वराचे जे मूल तत्व आहे, 'ते तूच आहेस.` तत् त्वम् असि।
'केवल` म्हणजे फक्त 'ते`, याचा अर्थ असा की, त्या व्यतिरिक्त अन्य, गौण अंगे असतील ती सर्व उपेक्षणीय होत.
केवल म्हणजे 'एक` नव्हे. शून्य नव्हे, 'एकमात्र` ही नव्हे. केवल म्हणजे `मात्र'.
'केवल` ही अशी अनुभूती आहे की , तेथे पोहोचल्यावर कोणाशी, कशाशी, केव्हाही संबंध नाही. ती सर्वथा स्थलकाल-विरहीत आहे.
'कैवल्य` म्हणजे संबंध-राहित्य.
सर्व जग बाद आहे, सं-वरद आहे. संबंध हा दोहोंना बांधतो. कर्ज घेणाराही बद्ध तसाच कर्ज देणाराही बद्ध. संबंध हे एक द्वंद्व आहे.
संबंधात निदान दोन वस्तू असतातच. एक दुसऱ्याला बांधतो असे आपण म्हणू. पण दुसराही बांधला जातो. दुसरा बांधला गेला नाही तर तो बद्धच नव्हे. या दोन पदांनी एकच घटना सांगितली जाते. ज्या पदाकडे बन्धकत्व येते ते पद तेवढ्या दृष्टिने मात्र बन्धक ठरते. दुसरे पदही विरूद्ध दृष्टिने बंधकच असते. मजूर-मालक, पति-पत्नी, भक्त-भगवंत ही प्रसिद्ध द्वंद्वे अशाच तऱ्हेने बद्ध असतात.
अब्राहम लिंकन म्हणतो, `ख लरि ििीं लश र ीश्रर्रींश, ख रश्रीि लरि ििीं लश र ारीींशी.` 'मी गुलाम होणे अयोग्य आहे, त्याचप्रमाणे मी मालक होणे गैर आहे.'
रूसो म्हणतो, 'अ ीश्रर्रींश ळी र ीश्रर्रींश लशलर्रीीश हश ळी श्रशीश ींि लशलिााश् र ीश्रर्रींश.'
या दोन अवतरणांत मालक व मजूर, पती व गुलाम यांच्या संबंधावर उत्कृष्ट तात्विक भाष्य झाले आहे.
संबंधात दास्य येते, अवलंबन येते, अधीनता येते. तो संबंध कुठलाही असो.
केवल म्हणजे संबंध-रहीत.
संबंध टाळणे शक्य आहे काय?
संबंध प्रत्यक्ष टाळणे अशक्य आहे. मात्र त्यामध्ये 'निवड` करणे, निदान तशी तीव्र इच्छा करणे ही कैवल्य-साधनेतील, पहिली पायरी आहे. ज्ञानाच्या सप्त्भूमिकांपैकी ''विचारणा`` ही येथे प्रकट होते.
५)
आसक्ती हे बंधनांचे कारण आहे.
क्रिया-प्रतिक्रिया हा संबंधाचा प्राण आहे.
स्थल-काल ही संबंधाची गृहीतकृत्ये आहेत.
आपले सर्व जीवन क्रिया-प्रतिक्रियात्मक द्वंद्वंामधून गतिमान होत असते.
बहुतांशी या क्रिया व प्रतिक्रिया बाह्य व मानसिक जगाच्या कक्षेत आपल्याला फिरवीत असतात.
अपमानामुळे क्रोध, स्तुतीमुळे सुख, मृत्यू अपघात यांमुळे दु:ख, अशा अनेक प्रकारच्या सामान्य प्रतिक्रियाच नव्या प्रेरणा बनून मनुष्याला पुन: कार्यान्वित करीत असतात.
क्रिया-प्रतिक्रियांच्या द्वंद्वांतच सुख-दु:ख, चांगले-वाईट ही द्वंद्वं अनुस्युत आहेत.
क्रिया-प्रतिक्रियांच्या प्रेरणांमुळे एक प्रकारे अगतिक होऊन पुढे ढकलला जात असताना मनुष्य स्वत:ला, त्या आद्य-प्रेरणेला विसरून जातो.
शक्तीच्या त्या मूल-स्त्रोताचे त्याला भान रहात नाही.
अशा प्रकारे ढकलले जाण्यात परतंत्रता आहे, दु:ख आहे, कारण त्यामागे पर-प्रेरकता आहे. हे एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे पण त्याच्या निश्चित ध्यानात येते.
बाह्य क्रिया-प्रतिक्रियांपेक्षा वेगळी प्रेरणा शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. या प्रयत्नाबरोबरच त्याचा, प्रवाहाचा उलट प्रवास सुरू होतो.
या प्रवासाची अखेर, शेवटचे ध्येय 'केवल` हेच आहे.
६)
कैवल्याचा अनुभव घणे शक्य आहे काय? 'कैवल्य` सिद्ध करणे शक्य आहे काय?
सुषुप्यैक सिद्ध: शिव: केवलो%हम्।
आद्य श्री शंकराचार्यांच्या या सुप्रसिद्ध पंक्तींमध्ये कैवल्याचा अनुभव व सिद्धि यांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचा अनुभवी स्वयंसिद्ध असतो. केवल-स्वरूप आत्मसात करावयाचे म्हणजे ते ओळखावयाचे इतकेच. गाढ झोप हा एक कैवल्यानुभव आहे. गाढ झोपेत जगाशी संबंध प्रतीत होत नाही.
गाढ झोपेत आपली इंद्रिये स्वस्थ असतात. त्यांचे व्यवहार बंद असतात, मनाचेही व्यापार थांबलेले असतात. तरीही झोपण्यापूर्वीचा 'मी` व झोपेनंतर जागा झालेला 'मी` एकच असतो. हा 'मी` म्हणजे सूत्रात्मा.
केवलांत जाग्रत -स्वप्न-सुषुिप्त् या अवस्था त्रयाचा निरास आहे.
ज्याला 'सूत्रात्मा` म्हणतात तो केवलाचे आदिदर्शन होय.
'केवली` ला मृत्यूची भीती नाही. कल्पनाच नाही. केवली-अवस्थेत सुखदु:खांच्या प्रतिक्रिया नसतात. मृत्यूची भीती ही केवळ सवयीने निर्माण झालेली भावना आहे. दुसऱ्याच्या मृत्यूने आपल्याला वाटणारी भीती ही प्रतिक्रिया आहे. ती व्यक्ती आपल्याला पुन: भेटणार नाही. या भावनेची ती प्रतिक्रिया आहे.
केवलानुभवाकडे संकेत करू शकणारे, निर्देश करू शकणारे एक प्रतीक आहे. आपल्या त्वचेवर येणारा कंडू खाजविल्याने शमतो. खाजविण्याने आपल्याला सुख होते अशी आपली कल्पना असते. खाजविण्याने त्वचा शांत होते असे आपल्याला वाटते.
पण कंडू रहित त्वचा, स्व स्थ त्वचा अधिक सुखमय नाही का?
त्वचा नैसर्गिक, निर्मळ असणे अधिक सुखकारक नाही काय?
कंडू असेल तर त्वचा, स्व स्थ त्वचा अधिक सुखमय नाही का?
त्वचा नैसर्गिक, निर्मळ असणे अधिक सुखकारक नाही काय?
कंडू असेल तरच त्वचा, असे आपण म्हणू शकत नाही. कंडूतहित त्वचा हीच नैसर्गिक त्वचा होय.
निर्मल, कंडूरहित त्वचेचा अनुभव म्हणजे केवलाचा अनुभव म्हणता येईल.
विषय-तृष्णा हा कंडू आहे. व इंद्रिये ही कंडू शमन करण्याची साधने किंवा उपकरणे होत.
उपभोग घेण्यांत, कंडू शमन करण्यात सुख आहे, पण उपभोग न घेण्यांत, घेण्याची इच्छाही न होण्यात अधिक सुख आहे. खरे सुख आहे.
या प्रतिकच्या कल्पनेने मला स्वत:ला कित्येक वर्षापासून उत्कृष्ट जागृती येते. ही कल्पना कैवल्यानुभूतीला विशेष उपकारक वाटत आली आहे.
७)
केवलाचा अभ्यास
पूर्ण बिंब हे केवलाचे उत्कृष्ट प्रतीक आहे. बिंबाला कोन नसतो. कोन नसल्यामुळे, तेथे बाहेरून आत जाता येत नाही.
ज्ञान हे कोन-प्रधान असते. ज्ञानांत 'मी` असतो, तू, ते, किंवा ते असतात. ज्ञानांत खंडभेद आहेत. विश्लेषण आहे. ज्ञाता - ज्ञान - ज्ञेय ही त्रिपुटी आहे.
पूर्ण `बिंब' हा 'भाना` चा अनुभव आहे. भानांत भेद नसतो. ज्ञानांत तो अल्पांशाने असणारच.
केवलाच्या ज्ञानापेक्षा त्याचे 'भान` अधिक उपकारक आहे. कारण ज्ञान शेवटी भानात विलीन होेते.
बिंंबाच्या अनुभवांत कोणत्याही प्रकारचा 'संबंध` संभवत नाही. बिंब-ध्यानांत स्थल-काल या द्वंद्वांचाही निरास आहे.
स्थल कालाची जाणीव नष्ट होण्यास प्रथम प्रथम आकाश-गंगा म्हणजे तारका पुंजाचा प्रवाह नंतर अनंत आकाश या दृश्यांचे सहाय्य होते.
या अभ्यासांत पुढे, बिल्वदल, श्रीशंकराचे तीन डोळे, स्थल, काल व परिणाम यांची त्रिपुटी हे विचार मनांत आले तरी चालतील. ते उपकारक होतील.
त्रिपुटीचा लय झाल्यानंतर बिंबाचे ध्यान आपोआपच प्रकट होते.
ज्ञाता-ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी बिंबोदयानंतर नष्ट होते.
बिंबाच्या अनुभूतींत विचार नाहीत. द्वैत नाही. शुद्ध, निर्मल कैवल्य आहे.
केवल या शब्दांत सुद्धा मोठे सामर्थ्य आहे. दिवसांतून काही क्षण तरी एकांतात बसून प्रत्येकाने केवलाचे चिंतन करावे.
या चिंतनाने शरीरात, मनोवस्थेत फरक पडतो. अवस्थांतर होते, भावांतर होते. एक स्वयंपूर्ण अनुभव प्रकट होतो.
श्वेताश्वतर उपनिषदांतील खालील श्लोकांत केवलाचा अनुभव बिंबित केला आहे.
एको देव: सर्वभूतेषु गूढ: सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा
कर्माध्यक्ष: सर्वभूताधिवास: साक्षी चेतो केवलो निर्गुणश्च।
श्वेताश्वतर उप. ६-९
सर्व भूतांच्या ठिकाणी गूढपणे, गुप्त्पणे निवास करणारा एक एकमात्र देव, सर्वव्यापी व सर्वभूतांच्या अंतरंगात असणारा, सर्व कर्मांचा कर्मनियतींचा अध्यक्ष, सर्व भूतांचा अधिवास - म्हणजे मूल-स्थान असणारे तत्व हेच साक्षी तत्व, चैतन्य, निर्गूण असे केवल होय.