रखरखीत ऊन, सावली ना कोठें
लागते पावलीं, जणू आग
मनाचा संताप, होउनी निर्दये
जीव पोळे सये, अनंतते
सोसतो हा त्रास, नव्हे प्रेमासाठी
जीव माझा हट्टी, जन्मतांच
आचरावें व्रत, जें जें अंगीकृत
म्हणूनी भोगित, कष्ट सारे
भेटताना आज, कित्येक ज्न्मांनी
नेत्र हे अश्रूंनी, अंध झाले
लक्षावधी अर्थ, मनात साठले
ओठ हे कोंदले, शब्दयोगे