कोठल्या कोठेच, नाहीसा झालास
इच्छांच्या खुणेस, भुलावलो
मृगजळामागे, जन्मोजन्मी गेलो
कोठेही स्थिरलो, नव्हे कदा
शैल ते सुखाचे, दुःखाच्या त्या दया
पाहियेला साया, वारंवार
त्याचत्याच पुन्हा, आल्या पायांखाली
वरी दृष्टि झाली, नाही माझी
एकदाच आता, वरी नेत्र केले
तो स्थान पाहिले, दिव्य माझे
अपयशे येऊ द्या, अशी वारंवार
जीवनेच्छा ठार, होऊ द्या ही
मिसळुनी राखेत, हेतु सर्व जावो
एक ही न राहो, आस चित्ती
निःशेष होऊ द्या, मला एकदाचा
नुरो गीत वाचा, गावयासी