नाटकी पेहराव, निर्धना घालूनी
राजपुत्र म्हणूनी, हिंडवीले
मुद्रिकेच्या अंगी, बसविले फत्तरा
नाव दिधले हिरा, असे त्यासी
मढ्यात सोडिला, आणूनिया वायू
तयाला मी आयू, समजलो
कुणी यावे, कुणी जावे
प्रेमनीरामध्ये नहावे
येथ कोणा ना मज्जाव
सर्वा सारखाच ठाव
येणे न लगे जाणे न लगे
निद्रेमध्ये आम्ही जागे
ऐसे चालले हे खूळ
केंद्राशिवाय वर्तुळ