त्याच स्थानी आता, यापुढे राहणे
तेथ न लगे जाणे, येथ्नि ही
नव्हे येथे तेथे, आता ते उरेले
जेव्हा तेव्हा झाले, एक मात्र
सत्य-असत्यांची, जाहलीसे गट्टी
येई नदीकाठी, तिचे पात्र
उदयास्त नुरे, माध्यान्हचि, आता
झालासे सर्वथा, अन्तर्यामी
अणूरेणूंमध्ये, संचरे चेतना
तुझ्या ह्या दर्शना, अशा घेतां
जडाला ओळखूं, कसे आता सांग
सजीव सर्वांग, सृष्टिचें ह्या
गारेंत तारका, दगडांत देवही
दृष्टि माझी पाही, आज कैशी