तुला मी विसरलो, कित्येक जन्मांत
तुझ्या न चित्तात, विसर माझा
तुझी हाक होती, नभांना घुमवीत
मलाच अज्ञात, जिचा अर्थ
नाटकाचे झाले, खरेखुरे जग
तोंडावरी रंग, चिकटला
अश्रूंचा जहलो, वारस सदाचा
झाली माझी वाचा, शोकयुक्त
शब्द सारे येती, अस्पष्ट हे ओठी
दुःखोर्मी ही पोटी, उठतात
झोक टाकताना, विसरलो अभिनय
जीविताचा लय, असा झाला