पहिला रुकार तो, ओठि या ठेवोनी
सखी गेली वनी, निघोनिया
स्मृती माझी उरली, नाही तिच्या मनी
वनवास या जनी, कंठी मीच
अशा सायंकाळी, एकली का येथें
काय चित्तीं येते, तुझ्या सांग
समोर दर्या हा, नेत्रि त्या वादळ
अंतरीचा छळ, दिसे ज्यांत
भीति वाटे मजला, करणार तू काय
पुढे झुकला पाय, तुझा का तो
थांब एक क्षण, समुद्र मी होत
``तुझे'' तें जीवन, मिळो मज