हिरवळीत तसल्या, अंग ते ताकुनी
नेत्र ही लावुनी, नभाकडे
कुणासाठी काय, मागसी ते सांग
होई आशाभंग, तुझाचि ना
तूच केलास ना, असा माझा घात
तुला दैवे हात, कसा द्यावा?
नभास, भूमीस, नगास, सरितेस
विलोकित बैस, सर्व काळ
परी मजला जेव्हा, पाहशील प्रेमाने
तेव्हाच ती नमने, तोषतील
कुणी केली सांगा, जायबंदी लता
जिला येत होता, बहर आज
माझ्या मनातली, तुझीच ती भक्ती
सांग तुवा का ती, छेदियेली