तुझ्या वेशीमध्ये, एकली तू उभी
राहूनिया नभी, पाहिलेस
एक तिथला तारा, आणि मी समोर
झुलवीत अंतर, तुझे होतो
नेत्रि त्याचे तेज, गीत माझे ओठी
परी कोणासाठी, तुझा जीव?
हाच अश्रू तुझ्या, नयनात जाऊनी
पुन्हा की तेथुनी, गळावाच
तरी तुला कळे, माझी ही वेदना
त्रास देते मना, किती कैसा?