कालपर्यंत ही, आस होती जीवा
सत्य ऐक्य भावा, असे आपुल्या
एकदाचे कळले, गूढ ते गंभीर
येई चित्त धीर, पुन्हा माझ्या
आत्मसिंहासनी, बैसण्या मी जातो
गीत माझे गातो शून्यतेचे
दूर एक तारा, लकाके आकाशी
माझिया आत्म्याशी, खुणावीत
देहाचे हे वाटे, सोडूनी बंधन
एकदा उडून, तिथे जावे