काही फुले मी वेचिली
काही स्वप्ने मी पाहिली
काही अश्रू मी गाळिले
काही प्रसंग मी टाळिले
परि मनी होते हेच
आणि आले घडुनी तेच
हेच हात ह्याच गळा
सदा चालो हा सोहळा
देवा तुझे माझे प्राण
झाले या क्षणी अभिन्न
कित्येक ह्रदयांचे, केलेस फत्तर
तुला भक्तिसूर, आळविताना
कित्येक जीवांच्या, राख संसाराची
केलीस कायमची, देवराया
तसेच माझे हे, भ्रष्टले जीवित
शून्य-गीते गात, फिरे मी हा