भावि कालामध्ये, आताच जाऊन
पूर्णतः पाहून, सत्य घ्यावे
धीर आता नुरे, संभ्रमी वागाया
स्वप्नात खेळाया, अज्ञतेने
गेली नांगरताना, पाळेमुळे तुटूनी
तृण या, न रानी, उरे मुळी
फाळ हातर्काचा, चालला कापीत
भावनांचा घात, असा घाला
नुरे जीवनकला, तर्क येता जवळी
जाई अंतकाळी, कुस्करोनॊ
मनामध्ये होते, भक्तीचे जे मूळ
तेथ तर्क खूळ, उगवले हे