काळोख भोंवती, एकला हा सूर
चित्तांत काहूर, उठे ऐसें
नभाच्या पोटांत, होतसे तो लुप्त्
परी अंतरांत दुणावतो।
निसर्गाचा नाद, जेथेजेथे नाचे
त्यात त्या वाचेचे, मिळो सूर
अंतरात्मा माझा, न राहॊ गीतात
विरून शून्यात, तया जाणे
दिव्य ते अनुभव, विरूनिया गेले
ते पुन्हा आणिले, कुणी चित्ती
गीत ते संपले, कुठूनी हे नाद
काढिती पडसाद, पुन्हापुन्हा
नेत्र का मिटलेले, स्वप्न ते भंगले
आयुष्य संपले, श्वास का हा?