किलबिलाट करिती, शांततेचे ध्वनि
असे अंत:करणी, सदा माझ्या
विस्मृत वृत्तींचा, होत पुनरुच्चार
जीवास बेजार, करावया
आजच्या कालच्या, मागील जन्मांच्या
स्मृतींचीच वाचा, बोलूं लागे
देह, चित्त, जीव होतात श्रुतिमय
ऐकण्या वाङ्मय, स्मृतींचे त्या
शुध्द प्रत्यक रूप, अहंकाराचे जे
अस्मदर्थ सजॆ, तयाने हा
केतकीचे टाका, पान ते काटेरी
खेळवा अन्तरी, सौरभार्थ