फिरावयास सहज, विश्वदेवी आली।
क्षणैक टेकली, घरी माझ्या।।
सांज झाली म्हणूनी, इतुक्यांत गेली ती।
कुणी न सांगाती, तिच्या आहे।।
नि:संग, निर्नेत्र, निर्देह, निष्काम।
शून्य मी निरात्म, वसे येथे।।
चक्रनेमिक्रम, विराट विश्वाचा।
असा चालायाचा, निरंतर।
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन।
कालाचें हे वन, फिरे आत्मा।।