अहं केन्द्रामध्ये, विश्व हे स्थापिले
ज्ञेय तत्व झाले, नंतरी ते
सत्यासत्य सिध्दी, अहंयोगे मात्र
ज्ञातृत्व सर्वत्र, अहंनिष्ठ
किनारे हे दीन, स्थलाचे, कालाचे
अस्तित्व उदधीचे, भासतात
आत्मचक्षू पाही, काठावरूनी त्या
जलाच्या हालत्या, जशा लाटा
बंध अस्तित्वाचे, आत्म्यास अज्ञात
दृश्य जो देखत, साक्षिदृष्ट्या