ज्ञानतेज माझ्या, कोंडिले गृहात
अंधार सर्वत्र, तुझ्या भवती
तुझ्या भवती कसला, माझ्या भवती तो
ज्ञान जो लपवितो, अज्ञ तोच
वर्णभेद आमुचे, जणू व्यक्तिभेद
नसे प्रेमबन्ध, बांधवांशी
पतित शत्रूंशीही, इच्छितो मम-त्व
बन्धूंत पतित-त्व, दिसे आम्हा
जन्मतश्च कोणा, न ये वर्णोच्चता
गुण-कर्म-भेदतः, वर्णसिध्दि