किती शूद्राचार, ब्राह्मण जातीत
अतिशूद्र बंधूत, ब्रह्मतेज
कर्मभेदानेच, ठरे ज्ञातिभेद
गौण ते संबंध, जन्मसिध्द
अहंमन्यतेच्या, नीचतेच्या धामी
देवि शूद्रते मी, वास केला
देवि शूद्रते मी, अपराध केले जे
तयांचेच ओझे, वाहतो हे
दास्यत्वी ठेविली, किती काळ तुजला
स्वार्थ पूजियेला, क्षुद्र बुध्द्या
पाप तेचि झाळे, असे हे प्रसूत
पांढरी ही लात, शिरी आली
दास्यत्वपंकी या, राहणे तोवरी
स्वातंत्र्य जोवरी, नसे तुजला