पान ४९/६
अन्त्यजांनो तुमच्या, जेवू द्या पात्रात
कृपण रूढिशास्त्र, जळू द्या ते
भूतकाल विसरा, थोरल्या ह्रदयाने
घास द्या कराने, मुखी माझ्या
स्मरण होता ज्याचे, जिवाचा थरकाप
तेच वृध्द पाप, आज गेले
अन्त्यजांनो तुमच्या, सावलीत येता
शांति माझ्या चित्ता, किती वाटे
जातिगर्वाच्या या, प्रखर उष्णतेने
आमची तनमने, पोळली ही