अन्त्यजांनो तुम्हा, आलो पूजावया
आणि उध्दराया, स्वतःलाच
उध्दार तुमचा तो, करावया शक्ती
नसे माझ्या हाती मुळीसुध्दा
दुःस्थितीचा तुमच्या, मीच आहे पिता
पाप तेच आता, धुवू द्या ना
अन्त्यजांनो तुमच्या, उत्कर्षवल्लीला
घाव मी घातला, आजवेरी
भिजवू द्या तिला या, आसवांच्या सलिली
वृत्ति दीन झाली, संस्मृतीने