मलिन वस्त्रामध्ये, देव माझा फिरे
क्षुधार्त वावरे, सर्व ठायी
अस्पृश्य मानिले, तयाला मी व्यर्थ
साधिला मी स्वार्थ, क्षणिकतेचा
शेवटी आंचवलो, मीच ऍक्य-भावा
वाटते हे जीवा, दुःख आता
स्वरूपात तुमच्या, पाहिला मी देव
वाहिला हा जीव, पदी तुमच्या
दगडातसुध्दा त्या, देवतांचा वास
नको हा आभास म्हणू माझा