भालदेशी दिसती, स्वेदमौक्तिके ही
श्वास चालू राही, अविश्रान्त
भूमिमातेवरी, दृष्टि ठेवियेली
अन्तरी पोषिली, पूज्यवृत्ती
दिव्य अलंकार, कृषीची साधने
शूद्रतादेवीने, घातले हे
शूद्रतादेवीची, विनयनम्र वृत्ती
चिंतिली मी चित्ती, सर्व काळ
अहंभाव माझा, सहज नष्ट झाला
आणि कोठे गेला ज्ञातिगर्व
शूद्रातिशूद्रांचा, दासानुदास मी
दास तितुका स्वामी, असे माझा