न्याहाळिले कोणी, चित्त माझे जरी
मूर्ति ही अंतरी, दिसायाची
परित्यक्त, त्रस्त, दुःखार्त मानव
तेवढाच देव, मला ठावा
चित्तफलकावरी, तयाचेच चित्र
सर्वदा सर्वत्र, ध्यान त्याचे
निघे जेथे जेथे, मन्द-करुण श्वास
तिथे माझा वास, असो देवा
उसासे दुःखाचे, जिथे वातावरणी
तिथे गीतवाणी, स्फुरो माझी