चिमण्या माझ्या मना, तुझ्या राज्यात या
कशाला यावया, पाहिजे ती
गुणगुणावी सदा, आपुली सद्गीते
तिच्या जी न चित्ते, जाणियेली
शब्द हे सत्याला, सौंदर्य प्रेमाला
व्यक्तित्व देवाला, नसे ना का?
हेतुसिध्दीसाठी, जयांचे अस्तित्व
तयांनी न तत्व, बध्द होई
सांततेच्यासाठी, व्यक्तित्वबंधन
वरिता ते, सत्य न, अनंततेचे