एखादे वेड जें, वाढवावे चित्तीं
तयानेच शांती, मिळे जगी
अनंतते, मला, तुझे लागे खूळ
शरीर देऊळ, तुझे झालें
चिमण्यांची चिवचिव, दाणापाण्यासाठी
तशी तुझ्यासाठी, वृत्तिची ह्या
भुरुभुरु हिंडती, येथ ना या अशा
तशा माझ्या आशा, मनामध्ये
उडीत त्या कुठे, घरट्याकडे चित्त
तयांचे लागत, सर्व काळी
तशी माझी दृष्ट्री, तुझ्या स्थानाकडे
जन्मजन्मी हिंडे, स्वैर जीव