सांत दृ्श्ये सारी, पसरली सर्वत्र
भव्य देहगात्र, अनंतेचे
विविधत्व जन्मते, सांततेच्यासाठी
तिचा वास पोटी, अनंतेच्या
उघडताच नेत्र, स्मिते दिसली सगळी
तुझी अंतराळी, विखुरलेली
श्वास होता चालू, तुझीच चेतना
घेऊनी जीवना, सुरु केले
जागृती होताच, विचारांची चित्ती
तुझी रम्य मूर्ती, चिंतियेली