झुरे माझा जीव, तुझ्यासाठी मात्र
पुढे केले पात्र, अभंगाचे
तुझी प्रेमभिक्षा, घेऊनी एकदा
हसेन गदगदा, अनंतते
धीर करी आता, शब्द निर्वाणीचा
काढुनी ही वाचा, थांबवितो
अफाट या नभीं, एक इवला पंख।
पाहतांच हरिरव, मना वाटे।।
वनांत निर्जन, झोंपडी एकली।
अशी कां राहिली, खडी तेथें।।
पापात्मा मी असा, तरी इच्छा एक।
मारिते कां हाक, अनंततेला।।