पाकळीपाकळी, फुलाने अर्पिली
फलसिध्दि झाली, अशामुळे
इंद्रियइंद्रिय, तुला मी वाहिले
अनुभवा आले, स्वयं ब्रह्म
भवानी पूजेला, आणिले भंडार
वासनांना ठार, करूनीयां
मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त
संपादिलें वित्त, विरक्तीचें
सखे अनंतते, असला जीवात्मा हा
तुझ्या पायीं वहावा, हीच इच्छा