’जरा जाऊ पुढे’, असे सांगूनिया
निर्जन सथळी या, आणिलीत
असा तुमचा हेतू, मला नव्हता ठावा
साधलात कावा, तुम्ही मात्र
कुठे ही का न्या ना, मिळेल ना प्रीति
जरी मी सांगाती, जन्मजन्मी
मी ही अनंतता, तुमचे ते जीवित
सदा मर्यादित, असायाचे
पुन्हापुन्हा यावे, तुझ्या घरट्याकडे
परी न सापडे, जीव माझा
कुठेसा तेथेच, ठेविला आहे मी
मागल्याच जन्मी, असे वाटे