पाहिला प्रकाश, त्या क्षणापासूनी
द्जी इच्छा मनी, आली नाही
जीविताचे व्हावे, लहानसे फूल
पूजिण्या पाऊल, तुझे देवा
मनाची मरुभूमी, पाहता पाहता
जीव हा सर्वथा, वेडावतो
ऊन मध्यान्हीचे, तळपते आत
पोळुनी टाकीत, जीवनाशा
मृगतृष्णिका ही, भासे अचानक
येई ऍकू हाक, दूर कोठे
जन्माजन्मान्तरी, चिन्तिलेले स्वप्न
होतसे अवतीर्ण, पुन्हा वाटे