वारुळाची वाट, मुंगीला ठाऊक
हळूहळू एक, पाय टाकी
मीहि जन्मांतरी, माझिया वारुळा
जाईन राऊळा, अनंतेच्या
उशाखाली माझ्या, कालाचा गालिचा
मुखामध्ये ऋचा, अनंतेची
अस्तित्व-रत्ने ही पाहा सभोवती
जणू लकाकती, आत्मतेजे
कैवल्यगंगा ही, सर्वत्र वाहते
विश्व हे नाहते, ब्रह्मानंदे