१०)
भारतीय तत्त्वशास्त्राच्या इतिहासात `' वाङ्मयाला एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.
प्रसिद्ध मीमांसक यामुनाचार्य याचा, सिद्धित्रय, हा ग्रंथ तन्त्रशास्त्रीय असला तरी त्यामध्ये मूलगामी असे तात्त्विक विचारही आहेत. विमुक्तात्मा यांचा `इष्टसिद्धी' हा ग्रंथ, मीमांसक मंडनमिश्रांचा `ब्रह्मसिद्धी' व सुरेश्वराचार्यांचा म्हणजेच, पुढे अद्वैतवादी झालेल्या मंडनमिश्रांचा `नैष्कर्म्यसिद्धी' असे अनेक सिद्धी-ग्रंथ अभ्यासकांच्या सहज स्मरणात येतील.
मधुसूदन सरस्वतींचा `अद्वैत-सिद्धी' हा ग्रंथ या सर्व सिद्धी-ग्रंथांचा मेरूमणी आहे. त्यातील, खालील श्लोक एका तत्त्वदर्शी व स्वानुभवी संन्याशाने मला कनकेश्वर येथे (१९१८) सांगितला होता. अनन्ततेचा प्रत्यय आणून देण्यास हा श्लोक समर्थ आहे.
सर्व जिज्ञासूंनी व मुमूक्षूंनी याचे संस्मरण, मनन व निदिध्यासन करणे उपयुक्त ठरले. निदान माझा तरी हा नम्र अनुभव आहे.
अनादिसुखरूपता, निखिलदृश्यनिर्मुक्तता ।
निरंतरं अनन्तता स्फुरणरूपता च स्वत: ।।
त्रिकालपरमार्थता, त्रिविधभेदशून्यात्मता ।
मम श्रुतिशतार्पिता तहदमस्मि पूर्णो हरि : ।।
वरील श्लोकात आलेले `अनन्तता' व `स्फुरणरूपता' हे शब्द किती रहस्यप्रापक आहेत हे तत्त्वजिज्ञासूंना सांगण्याची आवश्यकता नाही. हा श्लोक येथे उद्धृत करण्याचे सुचले हे एक अनन्ततेचे स्फुरणच आहे!
.....