प्रकाशित साहित्य

स्वत:चे संपूर्ण संकलन ज्या अवस्थेत होते, त्या अवस्थेला `सं-राधन' म्हणणे योग्य

७)

 

व्यासांनी `ब्रह्म अव्यक्त आहे' या सूत्राचे विवरण करताना, प्रत्यक्ष व अनुमान याप्रमाणेच `सम्+राधन' असे एक प्रमाण सुचविले आहे. समाधिअवस्थेत जे स्फुरण होईल ते स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाश असे प्रमाण सांगितले आहे. (ब्र.सू. ३-२-२६)

 

ज्ञानाचा प्रसाद म्हणून ध्यानाची अवस्था प्राप्त झाली असता ह्या निरंजन, परम साम्याचा अनुभव येतो. `ब्रह्मविदां वरिष्ठ:' अशा ज्ञानाच्या उच्च कक्षेपर्यंत पोचलेल्या विद्वानाला हा अनुभव येतो. अश्या स्थितीत जे स्फुरण होते ते स्वयंप्रमाण व स्वयंप्रकाश असते.

 

हे `सं-राधन' म्हणजे अनन्त-तेशी एकरूप होणे आहे.

 

`आराधन' हा सुपरिचित शब्द साधारणपणे संराधनाची पूर्व-अवस्था म्हणता येईल. आ-म्हणजे समंतात्. सं-म्हणजे साकल्याने. संराधना- मधील संग्रह सर्वस्वाचा समावेश करणारा आहे. Self-collection किंवा स्वत:चे संपूर्ण संकलन ज्या अवस्थेत होते, त्या अवस्थेला `सं-राधन' म्हणणे योग्य होईल. या संपूर्णतया एकाग्र अवस्थेत सत् तत्त्वाचे अभिनव दर्शन शक्य होते. या अनुभवाला स्फुरण किंवा स्फूर्ती असेही अभिधान आहे. 

 

बादरायणांच्या ब्रह्मसूत्रांतील

 

अतो अनन्तेन, तथा हि लिंगम्  । ३.२.२६

 

या सूत्राचे, `अतो अनन्तेन संयुक्त:' असे विवरण श्री शंकराचार्यांनी केले आहे.

 

जो सान्त आत्मा आहे तो अनन्तासह एकरूप होतो असे श्रुति सांगते.

 

सं-राधन या अवस्थेत ब्रह्माशी म्हणजे अनन्त-तेशी पूर्णत: एकरूप झाल्यामुळे, त्या सामरस्य स्थितीत ज्ञानाचे अपूर्व व अभिनव उन्मेष सहज-शक्य व सहल-सुलभ होतात.

.......

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search