६)
प्रतीतव्यप्रतीत्योश्च भेद: प्रामाणिक: कुत: ।
प्रतीतिमात्रं एव इदं विश्वं चराचरम् ।।
-प्रकाशानंद
प्रतीतव्य म्हणजे वस्तू. वस्तू व तिची प्रतीती यामधील भेद प्रामाणिक कसा म्हणावयाचा? त्या भेदाची पुन: प्रतीती आली पाहिजे तरच तो भेद खरा. भेद हा प्रतीतीचा एक नवा विषय किंवा वस्तू झाली पाहिजे. हा भेद एकदा, दोनदा, अनन्त वेळा केला तरी त्याचे उत्तर नाहीच.
पुनश्च भेद आणि त्याची प्रतीती-येथे अनन्ततेचे दर्शन होते.
केवळ बुद्धियोगानेच अन्तिम सत्य अनुभवावयाचे असेल त्यांना ही विचारसरणी सर्वथैव उपयुक्त वाटेल. आपल्या प्रतीतीबद्दल विचार करावयास सुरुवात करावयाची. प्रतीती हे आपले प्रमाण आहे. या दोघांमधील भेद आपल्याला कळतच असतो. पण हे भेद, खरा की खोटा आहे हे ठरविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भेदाची प्रतीती येणे. ती तर अशक्य आहे. कारण, तो अनन्त व्यवसाय आहे.
.....