प्रकाशित साहित्य

`शक्नोति' म्हणजे जी करू शकते ती शक्ती.

३)

 

अनन्त-तेची पूजा म्हणजे खरोखर शक्तीची पूजा आहे. शक्तिपूजा हे केवळ भारताचे वैशिष्ट्य नाही. जगामधल्या बहुतेक संस्कृतीत, देशात ते आढळते. अनन्त-ता या शब्दाने `शक्ती' अभिप्रेत आहे. अमर्याद असते तीच शक्ती. शक्तीच्या आविष्काराला मात्र मर्यादा येतात. पण शक्तीला स्वत:ला मर्यादा नाहीत.

 

अनन्त-ता हे प्रतीक, ही कल्पना मी स्वीकारली याचे कारण `शक्ती' या शब्दाचा मूल अर्थ-निरुक्तार्थ, असावा तेवढा परिचित, प्रसिद्ध नव्हता. वस्तुत: शक्ती हा शब्द अनन्ततेचा द्योतक आहे. `शक्नोति' म्हणजे जी करू शकते ती शक्ती. सर्व आविष्कारांच्या व आविर्भावांच्या मूळाशी असणारी प्रेरक-शक्ती म्हणजे शक्ती.

 

शक्ती शब्दाची निर्मिती अनन्त-ता या शब्दाच्या निर्मितीसारखीच कृत्रिम वाटली असेल. जी करू शकते ती, किंवा प्रेरक-ता हे शब्द असेच दूरन्वयित व कृत्रिम वाटतात. `शक्ती' हा शब्द कारक-ता शब्दासारखाच आहे. 

 

शून्यता, शूद्रता या मी वापरलेल्या शब्दांप्रमाणेच कारक-ता हा शब्द मला जवळचा वाटतो. त्याला उद्देशूनदेखील काही ओळी, काही अभंग मी लिहिल्याचे स्मरते. 

 

शक्ती या कल्पनेचे महत्-तत्त्वाशी, उपाधीची व प्रत्यक्ष ब्रह्माशी ऐक्य असलेले या अभंगांत सांगितले होते. अनन्त-ता ही अन्तिम कारक-ता म्हणून वर्णिली होती.

आधुनिक विज्ञानातील causality या शब्दाचे कारक-ता या शब्दाने मराठी रूपान्तर होऊ शकेल. cause म्हणजे कारण. causal म्हणजे कारणविषयक. causality म्हणजे कारकता.

 

....

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search