महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

माधवरावांचे एकूण व्यक्तीमत्व

माधवरावांचे एकूण व्यक्तिमत्व:

कर्तृत्ववान व आज्ञाधारक तसेच शिक्षणप्रेमी. म.गो.हे अत्यंत काटकसरी होते.
अत्यंत स्वाभिमानी परंतु समाजाशी फटकून वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
तसेच संपूर्ण स्वावलंबन हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
माधवराव स्वत: विद्वान होते.
वाचनाच्या व अभ्यासाच्या आवडीबरोबरच त्यांना प्रवासाचीही आवड होती.
स्वभाव :  माधवरावांसारख्या स्वाभिमानी व समाजाशी फटकून वागणार्‍या व्यक्तींची करमणुकीची साधने म्हणजे कथा, प्रवचने, वाचन, व्याख्याने हीच असत.
माधवरावांच्या स्वभावविशेषामुळे ते कधी कुणाच्या घरी जात नसत व कोणाला आपल्याकडे गप्पाट्प्पा करण्यास बोलावत नसत. वेणूबाईंनाही त्यांनी कधी नातेवाईक अगर मैत्रिणींकडे जाऊ दिले नाही.
माधवरावांची स्वत: ज्ञान घेण्याची सवय जन्मभर टिकली. निरनिराळी प्रदर्शने पहाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पहाणे, व्याख्याने ऐकणे हा त्यांचा छंद होता.  
माधवराव अतिबुध्दिमान होते. परंतु माधवराव अतिशय तापट स्वभावाचे होते. त्यांचा व त्यांच्या बुध्दिमत्तेचा दबदबा असे पण ते हळवेही होते.
प्रवासाचीही त्यांना आवड होती. त्यांना पायी प्रवास करणे खूपच पसंत होते. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा त्यांनी पायी प्रवास करून पाहिला होता.
वेळच्यावेळी जेवण व झोप या त्यांच्या परिपाठामुळे त्यांचे ७४ वर्षांचे आयुष्य आरोग्यसंपन्न व सुदृढ होते.
वेणूबाईंची आई जिवंत होती तोपर्यंत माधवराव रात्री साडेआठला जेवत. तत्पुर्वी तास-दीड तास आळीतच असणार्‍या मामा शेडाणीकर, वैद्यांकडे सोंगट्या खेळत. साडेआठाच्या आसपास नवा डाव त्यांनी कधीही सुरू केला नाही. पुष्कळ वेळा डावही अर्धवट टाकीत, पण घरी वेळेवर येत. खेळात माधवराव चांगले अगर वाईट कसेही दान पडले तरी शांत असत. ते कधीही आवाज चढ्वत नसत. क्षुल्लक खेळातील जयापजयाने आपली मनःशांति ढ्ळू देणारे ते नव्हते. माधवरावांना गंजिफाही येत. वेणूबाईंनाही त्यांनी त्या थोड्या शिकवल्या होत्या.

पोषाख: माधवरावांना जनमताची कधीच भीड वाटत नसे. उदाहरणार्थ त्यांचा पोषाख- ऋतूमानाप्रमाणे तो बदले. ते उन्हाळ्यात धोतर-उपरणे व गांधी टोपी वापरत. पावसाळ्यात कधीचा सदरा घालीत तर हिवाळ्यात कोट, कानावरून ओढ्लेली गांधीटोपी , हातात हातमोजे, पायात पायमोजे घालून वर पुणेरी जोडा घालीत.

तो पोषाख फारच विचित्र दिसे. लोक हसत पण माधवरावांना त्याची पर्वा वाटत नसे. तारूण्यात पगडी घालणारे माधवराव नंतर गांधीटोपी घालू लागले. त्यांनी सोयीकरता केवळ हा बदल केला. गांधीटोपी हलकी असते, वारंवार घेता येते, थंडी वाजू लागली की कानावरून घेता येते तर वेळप्रसंगी बाजारात घेतलेले पदार्थ ठेवण्यास उपयोगी पडते. यासारख्या अनेक सोयींमुळे माधवराव गांधीटोपी वापरू लागले. परंतु समारंभ प्रसंगी ते पगडीच वापरीत.

पोषाख माणसाच्या स्वत:च्या सुखाकरीता असतो, दुसर्‍यांना दृष्टिसुख देण्याकरता नव्हे, त्यामुळे सायकलवरून जाताना ते त्याकाळी प्रचलित असलेली मडमांची हलकी व रूंद पट्टीची टोपीही घालत. लोकांच्या टीकेची त्यांना कदर वाटत नसे. पोषाखात सभ्यता व स्वच्छता या दोन गोष्टींना महत्त्व आहे,  इतर बाबी गौण आहेत असे त्यांचे मत होते. माधवरावांची ही निडर वृत्ती वेणूबाईंच्यात आली होती.
 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search