न्यायरत्न रोटरी या जागतिक संघटनेचे अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या युनायटेड नेशन्स्, अमेरिकन असोशिएशन ऑन युनायटेड नेशन्स, राऊंड टेबल फाऊंडेशन, युनिव्हर्सऑलिस्ट चर्च, सायकॉलॉजिकल फाऊंडेशन ऑफ न्यूयॉर्क, पायथॉगोरियन सोसा., अशा अनेक संस्थांनी न्यायरत्नांना सन्मानपूर्वक सभासद करून घेतले होते.
लंडनमध्ये लंडन सायकिकल रिसर्च सोसा., ईस्ट अँड वेस्ट फ्रेंडशिप कौन्सिल या संस्थांचे सन्माननीय सभासदत्व त्यांना दिले होते.
इंग्लंडमध्ये तत्त्वज्ञ सी.इ.एम्. जोड, बरट्रान्ड रसेल आणि डॉ. युंग यांच्याशी त्यांचा चांगला परिचय झाला.
Fellow of the Royal society of Arts या नामवंत संस्थेचे सभासदत्व त्यांना देण्यात आले.
नॉर्वेचे त्यावेळचे राजे सातवे हॉकन यांनी न्यायरत्नांना भजनासाठी बोलावले होते.
त्यासुमारास त्यांनी ९ जुलै रोजी उत्तर ध्रुव परिसरात भर मध्यरात्री तळपणारे सूर्यबिंब पाहिले होते.
ताजमहाल हॉटेल, एलफिस्टन कॉलेजच्या जवळच आहे. तेथे येणारे अनेक परदेशी पाहुणे तरुण न्यायरत्नांची ओळख करून घेण्यासाठी धडपडत असत. हस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक व ज्योतिषाचा व्यासंग विनोदांना असल्याचे त्यांना कळत असे. राजे अमानुल्ला, सर अकबर हैदरी यांचे हात न्यायरत्नांनी तेव्हा पाहिले होते.