त्यांची आई रमा कनवाळू-मायाळू-कष्टाळू होती. त्यांचे माहॆरचे नाव द्वारका. द्वारकेच्या आईचे नाव येसूताई. द्वारका दीड महिन्य़ाची असताना तिचे वडिल प्लेगच्या साथीत गेले. येसूताईचे दूरचे बंधू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. पुण्यात सन्मानानं जगण्यासाठी येसूताईंना अण्णासाहेबांची मोठी मदत झाली. येसूताई व नंतर रमाबाई यांना महर्षींचे घर हक्काचे माहेर होते.
त्यांच्य़ा रमाबाईंचे लग्न महादेवराव अभ्यंकरांशी वयाच्या १० व्या वर्षी झाले. त्य़ा काळच्य़ा मानानं ४ वर्षे उशीराच.
त्या काळातील मध्यम वर्गीय गृहिणीप्रमाणे त्यांनीही घरात खूप कष्ट केले. रमाबाईंना महादेवरावांची खूप ताबेदारी होती. जेवणा-खाण्याच्या वेळेबद्दल ते खूप काटॆकोर होते. तरीही घरात भांडण-तंटणाचे प्रसंग फारसे झाले नाहीत.
त्यांना घरात काम करणाय्रा मंडळींविषयी सहानुभूती वाटायची. त्यांचे कष्ट कमी कसे होतील असे त्या पहात असत. शिवाय जमेल तशी मदतही त्या करीत असत.
वेणू आपल्या आईला वहिनी म्हणत असे. त्या भावंडात सर्वात लहान होत्या. त्या अतिशय हुषार व सरळ स्वभावाच्या असल्यानं आईच्या विशेष मर्जीतल्या होत्या. वेणू शाळेत कायम पहिली येत असे. "मी तुझ्या लग्नाची घाई करणर नाही" असे त्यांची आई त्यांना म्हणत असे. वेणूबाईंच्या इतर भावंडांची लग्न दहाव्या वर्षी झाली होती.
रमाबाई अतिशय स्वाभिमानी होत्या. मृत्युनंतर करण्यात येणाय्रा विधींसाठी लागणारी रक्कम, त्यांनी आजन्म काटकसर करून स्वतःच्या मृत्युपूर्वीच बाजूला काढून ठेवली होती. वेणू १० वर्षांची असताना त्या स्वर्गवासी झाल्या. त्यांचा विरह लहान वेणूला खूपच जाणवला.
त्यांनी लहानपणी केलेले संस्कार, मॆत्रेयी विनोदांना आजन्म उपयोगी पडले...
- प्रगाढ ईश्वरनिष्ठा
- सचोटीचं वागणं-बोलणं
- नित्यनियमानं कुळ्धर्म-कुळाचाराचं पालन
- अडल्या-पडल्याला मदत
- निरलसता
- जे जेवढं असेल त्यात समाधान
- व्यावहारिक सूज्ञपणा
लोकमान्य टिळक त्यांना म.गो. असे म्हणत.
त्यांचे वडिल कंत्राटदार होते. कात्रज बोगदा व घाटाचे काम त्यांनी केले होते. म.गो.चे आई-वडिल अतिशय ईश्वरभक्त होते. म.गो.चं बालपण अतिशय वैभवात गेलं. त्यांचे वडिल प्लेगच्या साथीत गेले. पतिच्या मागे, म.गो.च्या आईने लहान मुलांना घेऊन धीरानं संसार केला. अप्पा बळवंत चॊकात त्यांनी घर घेतलं. वेणूबाई आपल्या वडिलांना माधवराव म्हणत असे. माधवराव सावकारी करीत असत.
मैत्रेयी विनोदांचे दोन भाऊ:
१) रामचंद्र
२) लक्ष्मण
वेणूबाईंना दोन भगिनी.
थोरली अक्का जी त्यांच्या आईच्या १४ व्या वर्षी झाली. त्यांचे सासरचे नाव- लक्ष्मीबाई भिडे.
त्यानंतरची बहिण कृष्णा ऊर्फ बायजाबाई.
मानलेला धाकटा भाऊ- गुरुदत्त
गुरूदत्तांची मैत्री म्हणजे निष्काम सौहार्दाचा निखळ अनुभव. वेणूबाईंच्या सख्ख्या भावांहूनही काकणभर जास्त प्रेम गुरूदत्तांनी आपल्या वेणूताईवर केले.
नंतर वेणूबाई आग्रा सोडून पुण्याला आल्या. दोघांच्याही नोकरीमुळे त्यांची वास्तव्याची ठिकाणे कायमच दूर राहिली. गुरूदत्तांकडे कॉलेजचे प्रधानपद तर वेणूबाईंचा संसार व नोकरी. त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी क्वचितच होत, पत्रेही थोडीच लिहीली जात. पण या गोष्टी त्यांच्या प्रेमाच्या आड नाहीत.
न्यायरत्नांबद्दलही गुरूदत्तांना आदर होता. त्यांना कविता करण्याचा छंद होता. त्यांच्या कवितासंग्रहात न्यायरत्नांना उद्देशून त्यांनी अनेक कविता केल्या आहेत.
+ + + + + + खास मैत्रिणी + + + + + +
* कृष्णा निमकर : शाळेतली तुल्यबळ प्रतिस्पर्धक आणि तेवढीच प्रेमळ व जिवाभावाची मैत्रिण.
* इंदूमती आर्ते : मुळची बडोद्याची. महाविद्यालयीन काळात भेटलेली अतिशय जिवलग मैत्रिण.
* सौ. सोनुताई कुळगावकर जोशी : मराठी चौथीतली मैत्रिण. वर्ग जबाबदारपणे सांभाळण्यास अतिशय हुशार. तिच्या संगतीने वेणूबाईंना पुष्कळ गोष्टी शिकता आल्या.