महर्षी न्यायरत्न विनोद

यांचे जीवन व कार्य

महर्षी विनोद

वाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व

महर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन

१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (-अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य)
कोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक,
हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि,
अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,

कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद

१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत.

धवलगिरी

धवलगिरी हा ग्रंथ महर्षींच्या उतारवयात प्रसिध्द झाला. हा ग्रंथ म्हणजे एका साधकाचे आत्मवृत्त आहे. साधनाकालात सद्‌गुरुकृपेने त्याची कशी प्रगती होत गेली याचे प्रासादिक भाषेत वर्णन आहे.

स्फुट अभंग

अभंगसंहिता या १९६८ या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये एकूण १८९ निवडक अभंग प्रसिद्ध झाले होते. याव्यतिरिक्त बरेच अभंग अप्रकाशित आहेत, असं माझ्या वाचनात आलं होतं. शांतिमंदिरातल्या जुन्या पेटार्‍यांमधील साहित्याचे वर्गीकरण केल्यानंतर महर्षी विनोदांच्या हस्ताक्षरातल्या बर्‍याच डायर्‍या सापडल्या. त्यातील ७ डायर्‍यांमध्ये अभंग सापडले.

संतांविषयी कृतज्ञता

महर्षींनी साधनासूत्रे व विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावनांमधून महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील व परधर्मीय संतांबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

Maharshi Vinod

Late Maharshi Nyayratna Dhundirajshastri Vinod, was a great Philosopher, Thinker, Mystic, Yogi, Freedom Fighter, Author and a Saint. Maharshi Vinod traveled world over as the 'World Peace Ambassador'.

वेणू अभ्यंकर तथा मैत्रेयी विनोद

मैत्रेयी विनोदांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतच्या काळातील ठळक प्रसंगांचे वर्णन. जन्म : २ सप्टेंबर १९०८, निर्वाण : २७ जून १९८१, अवघे ७३ वर्षांचे आयुष्य. २००७-२००८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम-आदर-कृतज्ञता अशा प्रकारे व्यकत करण्याचा प्रयत्न.

साधनासूत्रे

महर्षींचा हा अजून एक ग्रंथ साधकांच्या नित्य वाचनात असतो. हे लेखन उपनिषदांप्रमाणे सूत्रबध्द पध्दतीने लिहिले आहे. एक एक वाक्य साधकाला चिंतनात नेते. याला साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर घट्ट बासुंदी म्हणत असत.

वेदपुरुष

महर्षींचा वेदांचा विशेषतः त्यातील उपनिषदांचा गाढा अभ्यास होता. वैदिक संस्कृती, वेदकालातील ऋषी, त्यांनी केलेले कार्य याविषयी ते आदरपूर्वक व सोदाहरण बोलत व लिहित असत.

भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी

तत्कालीन विविध मासिकांचे संपादक, महर्षींकडून सन्मानपूर्वक साधनासूत्रे लिहून घेत असत. ते परदेशांमध्ये गेले तरी त्यात खंड पडला नव्हता. चैत्रापासून ते फाल्गून महिन्यापर्यंत जे महत्त्वाचे सण भारतभर साजरे केले जातात.

थोर नेत्यांविषयी कृतज्ञता

या मालिकेत श्री शिवाजीमहाराज, श्रीभगतसिंग व श्री. लोकमान्य टिळक यांच्या विषयी महर्षींनी लिहिले आहे. तरुणपणी त्यांचा परिचय ते श्रीभगतसिंगाच्या आतल्या गटातील असा होता. श्रीभगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेनंतर ते इतरांबरोबर भूमिगत झाले होते.

परदेशातील कार्य

न्यायरत्न रोटरी या जागतिक संघटनेचे अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या युनायटेड नेशन्स्, अमेरिकन असोशिएशन ऑन युनायटेड नेशन्स, राऊंड टेबल फाऊंडेशन, युनिव्हर्सऑलिस्ट चर्च, सायकॉलॉजिकल फाऊंडेशन ऑफ न्यूयॉर्क, पायथॉगोरियन सोसा., अशा अनेक संस्थांनी न्यायरत्नांना सन्मानपूर्वक सभासद करून घेतले होते. लंडनमध्ये लंडन सायकिकल रिसर्च सोसा., ईस्ट अँड वेस्ट फ्रेंडशिप कौन्सिल या संस्थांचे सन्माननीय सभासदत्व त्यांना दिले होते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search